सुपरफास्ट बातमी
प्रतिनिधी ( शेवगाव ) दि.२८.०९.२०२३
शेवगाव शहरातील क्रांती चौक येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष,ऑल इंडिया स्टुडन्ट फेडरेशन, ऑल इंडिया युथ फेडरेशन, शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन, लाल बावटा रिक्षा युनियन यांच्या वतीने प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी भगतसिंग के देश मे जात पात धर्म का झगडा नही चलेंगा, इंल्काब जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. यावेळी ऑल इंडिया स्टुडन्ट फेडरेशन व ऑल इंडिया युथ फेडरेशन यांच्या वतीने राज्य स्तरीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये गौतमी नांगरे, सायली वरे, सम्राट सावंत, शिवरुद्र मडके, अक्षरा मडके, राज वरे, सैफ आतार, मुज्जू शेख, दिव्या नांगरे, सुरज नांगरे, प्रेम मगर आदीसह विद्यार्थ्यांना या परीक्षेत सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ.सुभाष लांडे, कॉ.संजय नांगरे, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पो.कॉ.प्रशांत नाकाडे, गुप्तचर विभागाचे पो.कॉ.बप्पासाहेब धाकतोडे, कॉ.संदीप इथापे, कॉ.राम लांडे, कॉ.गोरक्षनाथ काकडे, कॉ.बबनराव पवार, कॉ.बबनराव लबडे, शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनचे इरफानखान, इस्माईल शेख, लाल बावटा रिक्षा युनियनचे प्यारे गायकवाड, जय मगर, अनिस शेख, सामाजिक कार्यकर्ते राहुल सावंत, बाळासाहेब काटकर, शिवाजी मडके, पवनकुमार साळवे, चंद्रकांत कर्डक, तानाजी मोहिते, संजय लहासे, सुरेश चव्हाण आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.