सुपरफास्ट बातमी
प्रतिनिधी ( अहमदनगर ) २८.१०.२०२३
मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. या मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आरक्षणावरील भूमिकेला राज्यातील विविध भागांतून पाठिंबा मिळत आहे. मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी अहमदनगर येथेही साखळी उपोषण सुरु करण्यात आलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या अहमदनगर येथील साखळी उपोषणास मुस्लीम समाजाने पाठिंबा दिला आहे. अहमदनगर येथील सय्यद हाजी हमीद ताकिया ट्रस्ट सावेडी या संघटनेने सुरु असलेले साखळी उपोषण तसेच मनोज जरांगे पाटिल यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला आहे. अशा आशयाचे पत्र ट्रस्टचे अध्यक्ष सय्यद साबीर अली मन्सुर अली यांनी सकल मराठा समाज अहमदनगर यांना दिले आहे.