भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसलात तर मुक्कामी कधी पोहोचणार ; ब्रम्हा चट्टे

0
सुपरफास्ट बातमी 
प्रतिनिधी ( पुणे ) २६.१०.२०२३
स्टंट करण्याच्या नादात मंगेश साबळे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रयत्नावर पाणी फिरवू नये. मराठा तरुणांनाही शांतता पुर्ण आंदोलन करावे. 
मराठा तरुणांनी हिंसक व्हावे, राज्यात मराठा x ओबीसी, मराठा X दलित दंगली व्हाव्यात यासाठी "महाशक्ती" कामाला लागली आहे. त्यामुळे सदावर्तेसारखे लोकं भडकावू विधान करत आहेत.

येत्या काळात मराठा विरोधी वक्तव्य करणाऱ्या तिनपाट लोकांची संख्या वाढणार आहे. मात्र तरीही मराठा तरूणांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलत हिंसक होवू नये. 

मराठा आरक्षणाची लढाईही मराठा समाजाच्या संयमाची व धैर्याचीही परीक्षा आहे. गांधीजींच्या मार्गाने अहिंसाचे तत्व अंगिकारत संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्याला अडथळा निर्माण होईल, असं कोणतंही कृत्य मराठा आंदोलकांनी करू नये. ही विनंती आहे.

शांतीपूर्ण सहजीवनासाठी आग्रही असणाऱ्या पुरोगामी मराठेतर मित्रांनाही विनंती आहे. त्यांनीही  मराठा विरोधी वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात भूमिका घ्या. हा काळ सगळ्यांसाठीच कसोटीचा आहे. एकमेकांना समजून घेण्याची हीच वेळ आहे. 

मराठा तरुणांनो भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसलात तर इच्छित स्थळी कधी पोहचणार ? 

- ब्रह्मा चट्टे 
पत्रकार
#मराठाआरक्षण

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)