प्रतिनिधी ( अहमदनगर ) २१.११.२०२३
भारतमाला परियोजनेतंर्गत GHV INDIA PVT. LTD. या कंपनीला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भारत सरकार यांचेकडून अहमदनगर शहराबाहेरील बायपास रस्ता चौपदरीकरण करण्याचे काम देण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने निंबळक बायपास चौक येथे उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे निंबळक बायपास चौक येथे रस्ता अरुंद झालेला आहे. त्याचप्रमाणे सदर कंपनीकडून निंबळक कडे जाणारा तसेच एमआयडीसी मधुन येणाऱ्या मार्गावर देखील थोड्या अंतराचे रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. मनमाड सोलापुर या मार्गावर अवजड वाहनांची संख्या प्रचंड असुन एमआयडीसी ते निंबळक या मार्गावर देखील अनेक छोटया-मोठया वाहनांची ये-जा सुरु असते. निंबळक बायपास चौक येथे रस्ता अरुंद झाल्यामुळे बऱ्याच वेळा वाहतूक कोंडी होत आहे. त्याचप्रमाणे अनेक वेळा छोटे मोठे अपघात झालेले आहेत. होत असलेल्या अपघातांमुळे नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालेला आहे. तसेच निंबळक व एमआयडीसीकडील रस्त्याचे काम करणेकरीता एमआयडीसी ते निंबळक या मार्गावरील वाहतुक वळविण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार दि. २०/११/२०२३ रोजीचे सकाळी ०८.०० वाजलेपासून ते दि. २७/११/२०२३ रोजीच्या सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत निंबळक ते एमआयडीसी रोडवरील सर्व प्रकारच्या वाहतुकीमध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे.
निंबळक मार्गे एमआयडीसीकडे जाणारे सर्व प्रकारचे वाहतुकीकरीता
- निंबळक चौक येथुन विळद बायपासकडे जाणारे सर्व्हिस रोडने सुमारे १०० मीटर अंतरावर जावुन उजवीकडे वळून पुन्हा केडगाव बायपासकडे जाणारे सर्व्हिस रोडने श्री लोढा यांचे खाजगी रस्त्यामार्गे एमआयडीसीकडे जातील.
तसेच एमआयडीसी मार्गे निंबळक कडे जाणारे सर्व प्रकारचे वाहतुकीकरीता
- एमआयडीसी श्री लोढा यांचे खाजगी रस्त्यावरुन विळद केडगाव बायपासचे सर्व्हिस रोडने सुमारे ५० मीटर जावुन डावीकडे वळून केडगाव वरुन येणारे बायपास मार्गाचे सर्व्हिस रोडने निंबळक बायपास चौक या मार्गाने निंबळक कडे जातील.
वरील आदेश उड्डाणपुलाच्या कामाच्या अनुषंगाने वापरात येणारे वाहनांना व अत्यावश्यक कारणास्तव स्थानिक
प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.