अहमदनगर (प्रतिनिधी) १५.११.२०२३
लोकांचे कल्याण करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे, परंतु आपले सरकार मात्र केवळ अदानी आणि अंबानीच्या कल्याणासाठीच झटत आहे, हे अत्यंत संतापजनक असून केवळ भारतातच नव्हे तर शोषितांना न्याय देणारे बळीचे राज्य जगभर यावे आणि त्यासाठी लढा देण्याची प्रेरणा या सम्राट एकलव्य जयंती व बळीमहोत्सवातून आपल्याला मिळावी, असे प्रतिपादन घरेलू महिला कामगार नेत्या तथा विचारवंत किरणताई मोघे यांनी केले.
अहमदनगर शहरात आयोजित केलेल्या पंधराव्या बळीमहोत्सव आणि सम्राट एकलव्य जयंती मिरवणूक समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. बळीराजाने लोकांच्या कल्याणासाठी आपल्या खजिन्याचा वापर केला. तर आज लोकांचे भले करावे म्हणून निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेवर आलेले लोकांचीच लूट करून भांडवलदारांची घरे भरत आहेत. या लुटीकडे लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून त्यांना भ्रामक अस्मितांच्या जाळ्यात अडकवून कष्टकऱ्यांमध्ये जातीधर्माच्या नावाने फूट पाडायचे राजकारण करीत आहे. त्याला आपण बळी पडता कामा नये. सर्वसामान्य जनतेने यातून बाहेर यावे आणि आपल्या खऱ्या शत्रूशी म्हणजे जातदांडगे आणि धनदांडगे यांच्याशी संघर्ष करावा, त्यासाठी हा बळी महोत्सव आयोजित केला असावा असे मला वाटते. त्यापुढे असेही म्हणाल्या की सरकार आज सर्वच क्षेत्रात संपूर्ण खासगीकरण करत आहे, अशा पार्श्वभूमीवर कोणत्याही जातींना कितीही राखीव जागा दिल्या तरी काहीही फरक पडणार नाही. कारण खासगीक्षेत्रात राखीव जागाच नाहीत. त्यासाठी खासगी क्षेत्रातही राखीव जागा असाव्यात ही मागणी आपण केली पाहिजे. तसेच त्यांनी अमेरिकन साम्राज्यवादाचा खरपूस समाचार घेत गाझापट्टीत इस्राईल करीत असलेल्या अत्याचारांची उदाहरणे देत जगभरातील मानवतावादी लोकांनी युद्धखोर इस्राईलचा निषेध करीत पॅलेस्टाईन जनतेसोबत आपला बंधुभाव व्यक्त केला पाहिजे असे मत मांडले. सरते शेवटी शोषितांना न्याय देणारे बळीचे राज्य जगभर यावे, असे सांगत आगामी निवडणुकीत लोकविरोधी भाजपा आघाडीला पराभूत करावे असेही आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बळीराजा आणि सम्राट एकलव्य जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर यांनी केले. आलेल्या सर्वांचे स्वागत महानगरपालिकेचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले.
सभेच्या सुरुवातीला युवा शाहीर हर्षदीप शरदकुमार सविता यांच्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरील गाण्याने सभेत जोश निर्माण केला. याप्रसंगी साहित्यिक आणि समीक्षक सुभाष थोरात, डॉ. प्रशांत शिंदे, नारायण पवार, पोपट गोलवड, सुनिल ठाकरे, इंजि. अभिजीत एकनाथ वाघ, संजय झिंजे, राजेंद्र गांधी, भाऊसाहेब थोटे, संध्या मेढे, भरत खाकाळ, यशवंत तोडमल, रवि सातपुते, अशोक सब्बन, अमोल बास्कर, जालिंदर वाल्हेकर, ॲड. महेश शिंदे, सुखदेव मर्दाने आदी उपस्थित होते.
या प्रसंगी सम्राट एकलव्य जयंती उत्सव व बळी महोत्सवाची मिरवणूक हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक ते दिल्लीगेट-चौपाटी कारंजा-चितळे रोड-कापडबाजार-माणिकचौक मार्गे महात्मा फुले स्मारक म्हणजे माळीवाड्यापर्यंत पारंपारिक वाद्यांच्या जयघोषात काढण्यात आली. मिरवणुकीत "इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो", " सम्राट एकलव्याचा विजय असो", "नवा एकलव्य येत आहे, दान अंगठ्याचे करणार नाही" इत्यादी घोषणा देण्यात आल्या. यंदाच्या वर्षी सम्राट एकलव्याची भुमिका चंद्रकांत रोहिदास माळी तर बळीराजाची भुमिका संतोष भागिनाथ गायकवाड या युवकांनी साकारली. बोल्हेगाव येथील शेतकरी दिलीप शेख यांच्या ट्रॅक्टरवर एकलव्य व बळीराजा विराजमान होऊन मिरवणूकीत सहभागी झाले होते.
मिरवणूक मार्गावर विविध ठिकाणी भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे माजी क्रीडाशिक्षक गोडाळकर सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह अभिजीत थोटे, जावेद मास्टर आदींनी शिवकालीन मर्दानी खेळ, लाठी-काठी, बर्ची, ढाल-तलवार आदी शस्त्रांचे प्रात्यक्षिक दाखवले.
मिरवणूकीत दरवर्षीप्रमाणे पारंपारिक वाद्याची साथ कै. दशरथ चव्हाण यांचे चिरंजीव अनिल चव्हाण, खंडू चव्हाण व भाऊ यांच्यासह भिंगार येथील रूपेश साळवे यांचे सहकारी महेश, अग्नेश व नागेश साठे, गणेश साळवे यांनी हलगी, ताशा व पिपाण्या वाजवून दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव पालवे, बारकू शिंदे, संदीप पवार, देविदास पवार, जालिंदर बोरुडे, संतोष बोत्रे, विजय केदारे, धनंजय गोलवड, कैलास गोलवड, देविदास गोलवड, सागर अहिरे, शुभम सोनवणे, वसंत माळी, संभाजी हनवत, महादेव गवळी, अशोक घोरपडे सर, सोनाली देवढे - शिंदे, माऊली लघाने, ॲड. विद्या शिंदे, विजय शिंदे, राजेंद्र कर्डिले, नागेश घटी, आबिद खान, सिध्दार्थ वाघ, शरद मेढे, एल. बी. जाधव सर रावसाहेब करपे, दत्ताभाऊ वडवणीकर, शाहीर कान्हु सुंबे, अतुल सातपुते, दिगंबर भोसले, संपत रोहकले, सतीश सातपुते आदींनी परिश्रम घेतले.