दिवंगत माजी खासदार तथा माजी चेअरमन दिलिप गांधी यांच्या देवेंद्र बंगल्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकणार नगर अर्बन बँकेच्या ठेवीदार , कर्मचारी , सभासद यांचा आसुड आक्रोश मोर्चा

0
सुपरफास्ट बातमी
प्रतिनिधी ( अहमदनगर ) २०.११.२०२३
जिल्ह्यासह राज्यात गाजत असलेल्या वैभवशाली नगर अर्बन बँकेच्या २५०/३०० कोटी रूपयांच्या लूट घोटाळा, सस्पेन्स घोटाळा तसेच चिल्लर घोटाळ्याच्या रकमा ठेवीदारांना परत मिळाव्यात यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. राजकीय पाठबळामुळे बँक लुटारू खुलेआम फिरत असून सार्वजनिक कार्यक्रमात आमदार खासदारांसह दाळ वाटप करताना बातम्यांमधूनही दिसून येतात. गोरगरीब, पेन्शनर, ज्येष्ठ नागरिकांनी अनेक तक्रारी करूनही पोलिस प्रशासन काहीच कारवाई करताना दिसून येत नसल्यामुळे येत्या बुधवारी ता. २२ नोव्हेंबर रोजी नगर अर्बन बँक ते कै. दिलीप गांधी यांचा देवेंद्र बंगला ते जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय असा मोर्चा सकाळी १०:३० वाजता काढण्यात येणार असल्याची माहिती बँक बचाव कृती समितीचे सदस्य तथा ज्येष्ठ नागरिक धोंडोपंत कुलकर्णी यांनी दिली आहे.

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सभासद, ठेवीदार, विद्यमान कर्मचारी, बँकेवर नितांत प्रेम, जिव्हाळा, आस्था, बँके विषयी अभिमान असणाऱ्या नागरीकांना आवाहन करताना म्हटले आहे की, सभासदांनो, बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा बंद झाल्या, सभेचे वार्षिक अहवाल बंद झाले. त्यामुळे सहकार सभागृहातील त्या खिडकी समोर तुम्ही घरचे लक्षाधिक्ष असुनही यदाकदाचीत २०० ते २५० ग्राम खाऊच्या पुड्यासाठी तुम्हासह महिलांचाही मोठा सहभाग असायचा त्या खाऊच्या पुडयांसाठी तुम्ही लाईनीत तिष्टत उभे असणारे सभासद तुम्हीच ना ?


अहवालासाठी तुम्ही सभासद बँकेत अहवाल मिळाले नाहीत म्हणुन तक्रारी घेऊन येत होतात. ते सभासद तुम्हीच ना ? आर्थिक प्रश्नावर जाब विचारणारे प्रश्नकर्तेही तुम्हीच होतात ना ? काळाच्या ओघात प्रश्नकर्तेही लुप्त झाले.

आता मात्र तुम्हीच सभासद डोळे बंद करून बँकेकड दुलर्क्ष करणे तुमच्या आळस उदासीन वृतीमुळे बँकेत घडणाऱ्या घटनांकडे बघ्याची भुमिका घेत आहता. त्यामुळे बँक लुटणारांवर कोणाचाच प्रतिबंध राहिला नाही. परिणाम बँक काराभाऱ्यांना  लुटता येईल तेव्हढे ओरबाडुन लुटुन खाल्ले परिणामी अनेकांचे संसार उभे करणारी, अनेक उद्योजक घडवणारी, गोरगरीबांना आधार असणारी तुम्हाआम्हा सर्वांचीच जिव्हाळयाची जिल्हयाची कामधेनु बँक बंद पडली.

परिणाम बँकेत तुम्ही शेअरच्या रुपात (भागभांडवल) गुंतवलेल्या रक्कमांना व त्यावरील तुमचा हक्काचा (डिव्हीडंड) लाभांशाला तुम्ही मुकलेला आहात. ऐवढे मोठे आर्थिक नुकसान सोसुनही तुम्ही आजुनही झोपेचे सोंग घेवुन बघ्याची भुमिका घेत आहात. आता तरी झोपेतुन जागे व्हा व बँक बचावच्या संघर्षात पुढे या. बँक वाचविण्यासाठी व बँक लुटणाऱ्या लुटारुंना शिक्षा झालीच पाहिजे. या मागणीसाठी ठेविदारांनो, बँकेचे अजुनही मोठ्या संख्येने ठेवीदार असुन त्यांच्या जवळपास ३५० ते ४०० कोटींच्या पुढे मोठया प्रमाणावर ठेवी आडकलेल्या आहेत. तुमचा ठेवीचा पै न पै रक्कमा तुम्हाला घरात बसुन आजिबात मिळणार नाही, हे लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल, प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल. विद्यमान कर्मचाऱ्यांनो, अरे तुमचा नोकरीचा, रोजीरोटीचा भयंकर प्रश्न तुमच्यासमोर उभा ठाकलेला आहे. बँक बचाव कृती समिती तुमच्यासाठी प्रयत्नशील आहेच.


 बँकेवर नितांत प्रेम करणाऱ्यानो, बँकेविषयी आस्था, आत्मियता व बँकेविषयी अभिमान असणाऱ्या  बँकप्रेमी नागरीकांनो, बुधवारी ता. २२.११.२०२३ च्या आसुड / आक्रोश मोर्चात हजारोंच्या संख्येने सामील व्हा. मनापासुन बँक बचाव संघर्षात साथ दया, असे आवाहन नगर अर्बन बँक बचाव समिती सदस्य धोंडोपंत एम.कुलकर्णी यांनी केले आहे.

मोर्चाबाबतचे पुर्वमाहितीपत्र जिल्हा पोलिस अधिक्षक यांनाही पाठविण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९६६५७३९६८२ या क्रमांकावर संपर्क करावा, असे कळविले आहे.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)