प्रतिनिधी ( पुणे ) १८.११.२०२३
पुण्यात राजमाता जिजाऊ यांच्या घराण्याचे वंशज म्हणून मिरवणाऱ्या तोतया नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळं फासण्यात आले आहे. पुण्यात नामदेव जाधव हे भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी शरद पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी नामदेव जाधवांना काळ फासल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळ फासण्यात आलं आहे.
पुण्यात आज लेखक नामदेव जाधव यांचा दिवाळी निमित्त भांडारकर इन्स्टिट्यूट येथे कार्यक्रम होता. सिंगापूरमध्ये शिवजयंती साजरी होणार आहे, या विषयावर आधारित कार्यक्रमाचा विषय होता. मात्र, डेक्कन पोलिसांनी नामदेव जाधव यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती.
कारण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून नामदेव जाधव यांना काळ फासण्याचा इशारा देण्यात आला होता. शरद पवारांबद्दल नामदेव जाधव यांनी वक्तव्य केलं होतं, त्या वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांना काळं फासणार असल्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला होता.
दरम्यान, डेक्कन पोलीसांनी परवानगी नाकारल्याने नामदेव जाधव एका ठिकाणी थांबून प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण करत तोंडाला फासले. नामदेव जाधव यांना काळं फासण्यात येत होतं, त्यावेळी पोलिसांनी त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.
Read Also :ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे