बळीमहोत्सव व सम्राट एकलव्य जयंती उत्सवाचे आयोजन उद्या सकाळी ९ वाजता होणार मिरवणुकीला सुरुवात सहभागी होण्याचे केले आवाहन

0

सुपरफास्ट बातमी
अहमदनगर (प्रतिनिधी) १३.११.२०२३
येथील शेतकरी कष्टकरी समाजाच्या वतीने गेल्या १४ वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या बळीमहोत्सव व सम्राट एकलव्य जयंती मिरवणूकीत यंदाही शिवकालीन शस्त्रांचे प्रत्यक्षिक दाखविण्यात येणार आहेत. शहरातील सुप्रसिद्ध क्रीडा शिक्षक गोडळकर सर आणि सहकारी ते करणार आहेत.

शेतकऱ्यांचा राजा असलेल्या बळी राजास कपटी बटूवामनाने दानशूरपणाचा गैरफायदा घेत पाताळात घातले होते. शेतकरी सण असलेल्या दिवाळीतील बळीप्रतिपदेला तोच बळीराजा आपल्या प्रजेचे हालहावल पहायला येतो. त्यांचे राज्य सर्वांना न्याय देणारे होते. बळीराजा हा संविभागी राजा होता. सर्वांना समान कष्टाचे फळ तो देत होता. म्हणून कष्टकरी, शेतकरी समुहामधे त्यांच्याबाबत प्रचंड आत्मियता आहे, म्हणून पिढ्यानपिढ्या आयाबहिनी आपले वडील, भाऊ, पती यांना ओवाळताना "इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो" अशी प्रार्थना करतात. त्यांच्याच स्मृती जागृत करत शेतकऱ्यांचे सध्याचे प्रश्न सोडविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात येवून त्याची अंमलबजावणी केली जाते, अशी माहिती देण्यात आली.


सकाळी ठिक ९ वाजता छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे समाधीस अभिवादन करून मिरवणूकीची सुरूवात होईल. सजवलेल्या ट्रॅक्टरवर सम्राट एकलव्य म्हणून चंद्रकांत माळी तर बळीराजा म्हणून संतोष गायकवाड हे विराजमान असणार आहेत. पारंपारिक गोंधळी वाद्यासह जयघोष करत हि मिरवणूक दिल्ली गेट, चौपाटी कारंजा, चितळेरोड, तेलीखुंट, कापडबाजार, माणिकचौक, आशा टॉकीज चौक, पांचपीर चावडी ते महात्मा जोतीराव फुले स्मारक, माळीवाडा येथे मिरवणुकीची सांगता होईल.

सांगताप्रसंगी पुणे येथील घरेलूमहिला कामगार नेत्या तथा विचारवंत किरणताई मोघे यांचे व्याख्यान होऊन कार्यक्रम संपणार असल्याची माहिती समिती तसेच सर्वांनी या मिरवणूकीत सहभागी होण्याचे आवाहन बळी महोत्सव समितीचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर व खजिनदार डॉ. प्रशांत शिंदे आणि आयोजकांनी यांनी दिली. अधिक माहितीसाठी भैरवनाथ वाकळे यांच्या ९४०५४०१८०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)