अहमदनगर येथे होणार लाल कांदा खरेदी केंद्र ; केंद्रीय कृषी सचिव यांचे आश्वासन

0

सुपरफास्ट बातमी
नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) १२.१२.२०२३
नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथे कांदा उत्पादनाला मिळत असलेला बाजारभाव अहमदनगर जिल्ह्यालाही मिळावा तसेच अहमदनगर (शिर्डी) येथे लाल कांदा खरेदी केंद्र त्वरित सुरु करण्याचे आदेश केंद्रीय कृषी सचिव रोहित कुमार सिंग यांनी संबंधीतांना दिल्याची माहिती शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव‍राव लोखंडे यांनी आज दिली.

Read Also: बळीराजाचा अवमानकारक फोटो प्रसिद्ध करून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

खासदार लोखंडे यांनी याबाबत केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री पियुष गोयल यांची लोकसभा परिसरातील त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी केंद्रीय कृषी विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग उपस्थित होते. लोखंडे यांनी केंद्रीय मंत्री गोयल यांच्याकडे कांदा खरेदी भावाच्या संदर्भात तीन महत्वाचे मुद्दे मांडले व याबाबत सविस्तर चर्चा केली. नाशिक, संभाजीनगर व पुणे जिल्ह्यात सध्या २४.०३ रुपये  प्रतिकिलो कांद्याचा खरेदी भाव आहे. मात्र अहमदनगर (शिर्डी) येथे याच काद्याचे २०.७५ रु प्रतिकिलो आहे . ही तीन रुपयांची नुकसान भरुन काढण्याकरीता केंद्र शासनाने केंद्रीय कृषी सचिवांमार्फत संबंधीतांना तसे आदेश द्यावेत व अहमदनगर जिल्ह्यातही रु. २४.०३ प्रति किलो प्रमाणे शासनाने  कांदा  खरेदी करण्याबाबतची विनंती केली.

Read Also: बापरे ! शेतकऱ्याला आला इतका पिकविमा , रक्कम घरी नेण्यासाठी केली सशस्त्र पोलीस संरक्षणाची मागणी

दुसरी महत्वाची मागणी  अहमदनगर येथे लाल कांदा खरेदी केंद्र त्वरित सुरु करावे व केंद्र शासनाकडून कांदा निर्यात बंदी हटवून त्याची निर्यात लवकर सुरु करावी ही मागणी केली. सोबतच तातडीने केंद्र शासनाकडून नाफेड आणि  एनसीसीएफ कडून कांदा खरेदी करुन चांगला भाव देण्यात यावा अशीही मागणी यावेळी खासदार लोखंडे यांनी केली.  

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)