प्रतिनिधी ( अहमदनगर ) १३.१२.२०२३
मराठा समाजाला कुणबी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरा करत असून प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या पद्धतीचे उपोषण आंदोलन चालू आहे...त्याच पद्धतीने अहमदनगर मध्ये देखील मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी नगरच्यातहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने एक डिसेंबर पासून साखळी उपोषण सुरू आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी नगर तालुक्यातील विविध गावांमधून पाठिंबा दिला जात आहे. त्याच अनुषंगाने 13 डिसेंबर रोजी आगडगाव येथील सकल मराठा समाज आणि इतर समाज ज्यांच्या वतीने देखील पाठिंबा दर्शवत अन्नत्याग आंदोलन यावेळी करण्यात आले आहे. जोपर्यंत मराठा समाजाला कुणबी मधून आरक्षण भेटत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार आहे. आगडगाव येथील सर्व समाजातील बांधवांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असून सरकारने तात्काळ कुणबी मधून मराठा आरक्षण द्यावं अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
यावेळी आगडगाव चे सरपंच परमेश्वर पालवे, उपसरपंच संदीप कराळे, सेवा सोसायटीचे चेअरमन नामदेव कराळे, सेवा सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.