अहमदनगर एमआयडिसीतील रस्ते व सोईसुविधांची कामे तात्काळ मार्गी लावावीत , शिवसेना ठाकरे गटाचे मा. उपसभापती डॉ. दिलिप पवार व शिष्टमंडळाने केली मागणी

0

सुपरफास्ट बातमी 
प्रतिनिधी ( निंबळक ) १४.१२.२०२३
अहमदनगर एमआयडीसीतील अंतर्गत रस्ते व इतर सोई सुविधांची कामे तात्काळ पुर्ण करावीत या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे पंचायत समितीचे मा. उपसभापती डॉ. दिलिप पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाचे निंबळक शाखाप्रमुख बी.डी. कोतकर , निलेश पाडळे यांच्या शिष्टमंडळाने एमआयडिसीचे उपविभागीय अभियंता संदिप बडगे यांना निवेदन दिले आहे.


अहमदनगर एमआयडीसी अंतर्गत असणारे बहुतांश रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. या रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असुन त्यामुळे कामगार , कारखानदार व नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यांवर आतापर्यंत असंख्य अपघात झाले आहेत. काही जणांना या अपघातांत प्राणसुध्दा गमवावे लागले आहेत. अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट नसल्याने चोरी , रस्तालुट व इतर गंभीर प्रकार घडत आहेत. तसेच चौका-चौकात असणारी झुडूपे यांमुळे समोरील येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघाताला सामोरे जावे लागत आहे. अशा विविध व्यथा मांडून रस्ते व सोई सुविधांची कामे तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली.

मागणी केलेले रस्ते व सोई सुविधा

  • पोलिस स्टेशन ते सुविधा हॉटेल रस्ता
  • दत्त हॉटेल ते इंडियन सीमलेस कंपनी रस्ता
  • गॅस कंपनी ते होगानस कंपनी रस्ता
  • साहिब बेकर्स समोरील रस्ता
  • मिरावली ( गॅलॅक्सी ) हॉटेल ते श्री टाईल्स चौक रस्ता
  • एल ब्लॉक मधील भूमिगत गटरींची कामे

मुख्य म्हणजे सन फार्मा ते निंबळक हा रस्ता अपुर्ण असुन त्यावर खड्डे पडलेले आहेत. त्यावरील डांबरीकरण ,स्ट्रीट लाईट ,फूटपाथ ,दुभाजक आदी बाबी अपुर्ण असुन ह्या ठिकाणी गंभीर अपघात घडत आहेत. एमआयडिसी कार्यालयातील तत्कालीन अधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला.परंतु कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. ही खंत व्यक्त करत हा रस्ता अपुर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. अभियंता संदिप बडगे यांनी लवकरच ही कामे पूर्ण करण्यात येतील असे आश्वासनही यावेळी दिले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)