रस्ता दुरुस्तीसाठी शिवसेनेचे डॉ. दिलिप पवार आक्रमक आंदोलनाचा दिला इशारा

0

सुपरफास्ट बातमी
प्रतिनिधी ( निंबळक ) २९.०१.२०२४
कल्याण हायवेला जोडल्या जाणाऱ्या केडगाव लिंक रोड या वळणावरील ठिकाणच्या रस्ता दुरुस्तीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे पंचायत समितीचे मा. उपसभापती डॉ. दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी , राष्ट्रीय महामार्ग क्र.४१ यांना निवेदन देण्यात आले.


हा रस्ता गेल्या दोन-तीन वर्षापासून अत्यंत खराब अवस्थेत आहे. बाजूला जास्त वसाहती झाल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात असणारे सांडपाणी आणि पावसाने तयार होणारे डबके यामुळे या ठिकाणी कायमच खड्डे पडलेले असतात. या रस्त्यावर परिसरातील शेतकरी , कामगार, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात. तसेच अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक अपघातही या ठिकाणी घडले असुन हा रस्ता दुरुस्त होणे अत्यंत गरजेचे आहे. लवकरात लवकर रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशारा ही डॉ. पवार यांनी यावेळी दिला.


यावेळी निंबळकचे मा. ग्रामपंचायत सदस्य बी.डी. कोतकर , निलेश पाडळे , दत्तुमामा दिवटे , दत्तात्रय कोतकर , अशोक शिंदे , शिवाजी दिवटे आदी उपस्थित होते.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)