मनोज जरांगे पाटील यांचीही कुणबी नोंद सापडली, या जिल्ह्यात मोडी लिपीत आढळला पुरावा

0

सुपरफास्ट बातमी
प्रतिनिधी ( छत्रपती संभाजीनगर ) ०७.०१.२०२३
ओबीसी प्रवर्गातुनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची देखील आता कुणबी नोंद सापडली आहे. बीडच्या शिरूर कासार तहसील कार्यालयामध्ये मोडी लिपीमध्ये ही नोंद आढळून आली आहे. मोडी लिपी संशोधन करणारे पथक शिरूर दौऱ्यावर होतं, त्यादरम्यान त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबातील व्यक्ती देखील कुणबी असल्याचा पुरावा सापडला आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यांचे वडील देखील आज शिरूर तहसील कार्यालयामध्ये हजर होते. नोंद मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.


मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी गेले दोन महिने लढा देत आहेत. मराठा समाज कुणबी असून त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी सरकारकडे लावून धरली आहे. त्यानंतर राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्यात येत आहेत. आजपर्यंत लाखो कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांचीही कुणबी नोंद सापडल्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)