केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांना छावा संघटना व शेतकरी दाखवणार काळे झेंडे

0
सुपरफास्ट बातमी
प्रतिनिधी ( अहमदनगर ) २२.०२.२०२४
नालेगाव, नेप्ती व निंबळक शिवारामध्ये नॅशनल हायवे गेलेला असून हायवे जमिनीपासून दहा ते पंधरा फूट उंच केलेला आहे. त्यामुळे तिन्ही गावातील शेतकऱ्यांना शेतीमध्ये शेती करण्यासाठी रस्ता नाही. रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये जाण्यासाठी फार मोठी अडचण झालेली असुन या प्रकरणात भारतीय राज्य मार्ग प्राधिकरण अहमदनगर यांच्याकडून नालेगाव शिवारातील शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध अनेक वेळा तक्रारी करून देखील दुर्लक्ष झाल्या असल्याने या प्रश्नासंदर्भात अनेकदा आंदोलने केली. व शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या संपादित केल्या मात्र त्यांचे डिझाईन चुकीच्या पद्धतीने केल्याने अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीत जाण्यासाठी रस्ताच राहिला नाही. वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे. शेतकऱ्यांनी अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषण केलेले असुन संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देऊन चर्चा केलेली आहे. परंतु अधिकारी शेतकऱ्यांची अडचण समजून घेण्यास तयार नाही. सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कमी पडत असून लोकशाही मार्गाने वेळोवेळी मागणी करूनही अधिकारी शेतकऱ्यांना पर्यायी रस्ता देण्यास तयार नाही व प्राधिकरण अधिकारी डी. एस. झोडगे दिशाभूल करून शेतकऱ्यांना अरेरावीची भाषा करत आहे. त्यामुळे अधिकारी झोडगे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांचे निलंबन करून स्वतःच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी 26 फेब्रुवारी 2024 रोजी रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे नगर कल्याण बायपास कांदा मार्केट येथे उड्डाणपूल बाह्यवळण रस्ता उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमास येणार असून त्यावेळेस छावा संघटना शेतकऱ्यांसह गनिमी कावा करून काळ्याफिती लावून काळे झेंडे दाखवणार असल्याचे छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे, जिल्हा अध्यक्ष सुरेखाताई सांगळे यांनी सांगितले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)