प्रतिनिधी (अहमदनगर )१७.०३.२०२४
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अहमदनगर व शिर्डी अशा दोन्ही लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
पाचव्या मजल्यावर हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ०२४१- २३४१९५५ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा mccnagar.election24@gmail.com या ई-मेल आयडीवर आचारसंहिता अंमलबजावणी बाबतच्या तक्रारी असल्यास नागरिकांना या कक्षाकडे - दाखल करता येतील, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी तथा - आचारसंहिता कक्षाचे नोडल - अधिकारी सुहास मापारी यांनी दिली.