सुपरफास्ट बातमी
अहमदनगर १८.०३.२०२४
अहमदनगरचा ‘शाह शरीफ’ दर्गा आजही अस्तित्वात आहे आणि
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे ते प्रतीक आहे.
ऐतिहासिक दमडी मशिदीजवळील दर्गा दर्या हे अहमदनगरमधील सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे. दुसरे सम्राट बुरहान निजाम शाह (1508-1553) यांच्या काळात पीर शाह शरीफ गुजरातहून अहमदनगरला आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याचा आजही अहमदनगर येथील "शाह शरीफ" दर्ग्याशी जवळचा संबंध आहे. दर्ग्याच्या उरूसावर त्यांचे कुटुंब अहमदनगरला हजेरी लावतात.
बाबाजी भोसलेंपासून छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ सुरू होते. त्यांना मालोजीराजे भोसले व विठोजीराजे भोसले असे दोन पुत्र झाले. त्यापैकी मालोजी राजे - शहाजी राजे आणि शरीफजी राजे यांचे पुत्र आहेत.
आता अनेकांना प्रश्न पडतो की मालोजी राजांच्या दोन्ही पुत्रांच्या नावांवर मुस्लिम नावांचा प्रभाव आहे. असे का?
त्यामुळे त्यामागे एक इतिहास आहे.
मालोजी राजांना मूलबाळ नसताना अहमदनगरमधील शाह शरीफ दर्ग्याची कीर्ती मालोजींच्या कानावर पडली.
या दर्ग्यात जे काही मागितले ते पूर्ण होते, अशी लोकांची श्रद्धा होती.
त्यानुसार मालोजी राजांनी दर्ग्यावर मुलाच्या जन्मासाठी प्रार्थना केली आणि वचन पूर्ण झाल्यास मुलाचे नाव 'शाह शरीफ' ठेवण्याचे वचन दिले.
हे वचन कायम ठेवावे, असे वाटून मालोजीराजांनी एका मुलाचे नाव 'शहा' शब्दापासून बनलेल्या 'शहाजी' आणि दुसऱ्या मुलाचे 'शरीफजी' असे नाव ठेवले.
तसेच यानिमित्ताने दर्ग्यावर दररोज नगारा वाजविण्याची प्रथा सुरू करण्यात आली.आजही भोसले कुटुंबीय दरवर्षी अहमदनगर येथील शाह शरीफ दर्ग्यात येतात.
शरीफजी राजे निजाम शाही सोबत मोगलांन विरुध्दच्या भातोडी युद्धात शहीद झाले.
आज शहाजी राजे भोसले यांची जयंती त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.💐💐
फिरोज शेख
09273252888
अहमदनगर महाराष्ट्र