प्रतिनिधी | अहमदनगर | २७.१०.२०२४
शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षक नेते राजेंद्र निमसे यांच्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली. निमसे हे नगर तालुक्यातील निंबळक जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शनिवारी निलंबनाचे आदेश काढले आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी निंबळक शाळेची तपासणी केली असता, निमसे हे वारंवार गैरहजर असल्याचे दिसुन आले. त्यांच्या वर्गाची गुणवत्ता तपासणी चाचणी घेतली असता , विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा खालावल्याचे आढळले. यासह, संकलित मुल्यमापन चाचणी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोडविण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे शिक्षकांचे आपल्या शाळेकडे दुर्लक्ष झाले असल्याचे स्पष्ट झाले.
या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषद प्रशासनाने त्वरित कारवाई करत निमसे यांना निलंबित करण्याचे आदेश काढले. त्यांच्या निलंबनाच्या काळात कोपरगाव हे मुख्यालय निश्चित करण्यात आले.
दरम्यान निमसे यांनी शिक्षण विभागाच्या शैक्षणिक निर्णयांना विरोध दर्शविल्यामुळे त्यांच्या शाळेची तपासणी करण्यात आली आणि त्यानुसार कारवाई करून वचपा काढण्यात आल्याची परीसरात नागरीकांत चर्चा आहे.